शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी विकत घ्यायची आहे? मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 10:23 IST

कधी नोकरीचे आमिष दाखवून... कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांना भेटायला बोलवायचे आणि मग सुरू होतो एक भयानक खेळ... मुलींचे अपहरण करायचे... लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करायची आणि बळजबरीने तिचे लग्न लावायचे... मुंबईत आणि महाराष्ट्रात अशी अंगावर काटा आणणारी प्रकरणे उघडकीस आली आहेत.

आशिष सिंह, विशेष प्रतिनिधीलासोपारा (पालघर) येथील अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. स्वत:ला सैन्यदलातील अधिकारी असल्याचे सांगत तिला भेटायला बोलावले आणि तिचे अपहरण करत राजस्थानमध्ये तिला लग्नासाठी विकले गेले. कुरारमधील (मुंबई) मुलीला राजस्थानमध्ये मोठा इव्हेंट असल्याचे सांगत केटरिंगच्या कामासाठी नेले आणि अपहरण केले... किंवा शाळकरी मुलीला नशेचे डोस देऊन तिची राजस्थानमध्ये विक्री करणे असो... या सर्व प्रकरणांत एक समान धागा आहे. 

मुलींचे अपहरण करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणात न्यायचे. वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी देऊन तिचे शोषण करायचे आणि लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या एखाद्या कुटुंबाला बळजबरीने तिला विकायचे. खरेदी-विक्री होणाऱ्या या मुलींना स्थानिक भाषेत ‘पारो’ म्हटले जाते. लाख-दोन लाखांत एजंटांकडून त्यांना खरेदी केले जाते. लग्नासाठी मुलगी न मिळणाऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले जाते. 

राजस्थान आणि हरयाणात काही कुटुंबातील मुलांची लग्न जुळत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने ते पैसे देऊन आपल्या मुलाचे लग्न बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अपहरण केलेल्या मुलींशी लावून देतात.  

मुंबई, महाराष्ट्रातून अपहरण केलेल्या काही मुली पोलिसांनी शोधल्यानंतर मिळाल्या, मात्र त्या पूर्ण खचून गेलेल्या होत्या. देशभरात सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायातील अनेक मुलींचा शोध अजून लागलेला नाही. त्या कुठे असतील?

मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट- एजंट, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करतात. ते अकाऊंट खूप काळापासून ॲक्टिव्ह असल्याचे दाखवितात. मग सुरू होतो खेळ. - देशातील वेगवेगळ्या शहरांतील सुंदर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. मैत्री करायची, भेटायला बोलवायचे. काहींना नोकरीचे आमिष दाखवायचे, अपहरण करून त्यांना विकायचे. - काही एजंट तर गरीब मुलींशी लग्न करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणाला घेऊन जातात आणि त्यांची विक्री करतात, त्यांचे बळजबरीने लग्न लावून देतात. 

एजंटच महत्त्वाचा !- राजस्थान आणि हरयाणातील या खरेदी-विक्री व्यवहाराला ‘पारो बिझनेस मॉडेल’ म्हणतात.- हे मॉडेल एखाद्या कॉर्पोरेट बिझनेस मॉडेलप्रमाणेच कार्यरत आहे. यात एजंटची भूमिका महत्त्वाची असते.- मुलीचे अपहरण केल्यानंतर एजंट तिला आपल्याकडेच बंदिस्त ठेवतात. मुलींचे शारीरिक शोषण केले जाते. - वेश्या व्यवसायात ढकलण्याची त्यांना धमकी दिली जाते. दरम्यान, त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जाते. - या मुली मनाने खचून जातात. पुन्हा कुटुंबाला कसे भेटणार, असा प्रश्न त्यांना सतावतो. त्या स्वत:ला अपराधी समजतात. - एजंटचे त्यातून अर्थातच फावते आणि तो लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करतात. - लग्नाला तयार न होणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. 

टॅग्स :MolestationविनयभंगRajasthanराजस्थानHaryanaहरयाणाmarriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र