तेलंगणा पोलिसांकडून वणीत सर्चिंग ऑपरेशन; २० जणांचे पथक घेतेय हत्येच्या आरोपीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 20:23 IST2021-05-02T20:23:04+5:302021-05-02T20:23:33+5:30
Police Search Operation : आरोपी अगोदरच्याच दिवशी येथून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र आरोपीने वापरलेले वाहन येथे आढळून आले.

तेलंगणा पोलिसांकडून वणीत सर्चिंग ऑपरेशन; २० जणांचे पथक घेतेय हत्येच्या आरोपीचा शोध
वणी (यवतमाळ) : रविवारी भल्या पहाटे तेलंगणातीलपोलिसांनी अचानक वणीत येऊन येथील एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरात सर्च ऑपरेशन केले. मात्र आरोपी अगोदरच्याच दिवशी येथून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र आरोपीने वापरलेले वाहन येथे आढळून आले.
वणी-यवतमाळ मार्गावरील राम शेवाळकर परिसरालगत राहणाऱ्या कोळसा व्यापाऱ्याच्या घरात २० जणांच्या पथकाने शोध मोहिम राबविली. सोबतच या व्यावसायिकाचा राम शेवाळकर परिसरात फ्लॅट आहे. तेथेही शोध घेण्यात आला. छोरिया लेआऊटमध्ये राहणाऱ्या एका नातलगाकडे देखिल तेलंगणा पोलिसांनी चाचपणी केली. मात्र आरोपी गवसला नाही.
पहाटे ५ वाजता तेलंगणा राज्यातील मंथाली विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पुट्टा मधुकर हा एका खून प्रकरणात तेलंगणा पोलिसांना वाँटेड आहे. तो वणीतील एका नातलगाकडे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजता पोलीस अधीक्षक शरदचंद्र यांच्या नेतृत्वातील पथक वणीत दाखल झाले. या पथकाने वणी पोलिसांना मदत मागितली. त्यानुसार ठाणेदार वैभव जाधव यांच्या सूचनेवरून डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव यांना या पथकासोबत देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा हायकोर्टाचे वकील वामनराव आणि त्यांच्या पत्नी नागमणी यांच्या खून प्रकरणात पुट्टा मधुकर हा आरोपी आहे. त्याचा पुतण्या बिट्टू श्रीनिवास याला पोलिसांना अगोदरच अटक केली आहे.