परळ येथे चाळीची भिंत कोसळली; वृद्धास किरकोळ दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 21:35 IST2019-03-20T21:33:56+5:302019-03-20T21:35:08+5:30
जखमी झालेल्या इसमाचे नाव शिगवण (६५) असून त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात आला.

परळ येथे चाळीची भिंत कोसळली; वृद्धास किरकोळ दुखापत
मुंबई - परेल व्हिलेज येथील महादेवाची वाडी इमारतीच्या प्रवेशद्वाराचे काम सुरु असताना भिंत कोसळून बाजूच्या चाळीतील वृद्ध किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या इसमाचे नाव शिगवण (६५) असून त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरएके पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी लोकमतशी बोलताना दिली.
परेल व्हिलेज येथील महादेवाची वाडी या इमारतीचे प्रवेशद्वार रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आत घेण्याचे काम आज सुरु होते. त्यादरम्यान इमारती शेजारी असलेल्या रामेश्वरी चाळीची भिंत कोसळली आणि त्याठिकाणी बसलेले ६५ वर्षीय शिवगण जखमी झाले. याप्रकरणी जबाब दाखल करून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती बनसोड यांनी दिली.