शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आंबेगाव बुदुक येथील भिंत दुर्घटनाप्रकरणी अभियंत्याचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 19:49 IST

कामगार राहत असलेल्या झोपड्यांवर सीमाभिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार १ जुलै रोजी घडला.

पुणे : आंबेगाव बुद्रुक येथे सीमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील स्थापत्य अभियंत्याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळून लावला आहे.लिंगराज चंद्रकांत बिराजदार (44, रा. हायवे रेसिडेन्सीच्या समोर, वडगाव बु. मुळ गाव रा. अक्कलकोट, सोलापूर) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. बिराजदार याला 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.  सीमाभिंतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबतचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाने दिला आहे. बिराजदार याचा गुन्हयात प्रत्यक्ष संबंध असल्याचेही समोर आले आहे. बिराजदार सिव्हील इंजिनिअर असून त्याची एका शिक्षण संस्थेनी नेमणूक केली आहे. भिंतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असताना देखील बिराजदार याने भिंतीचे बिल सर्टिफाईड करून रक्कम दिली आहे. आंबेगाव बुद्रुक येथे सर्व्हे क्रमांक 10/10 येथे सखाराम गणपत कोंढरे यांच्या 19 गुंठे जागेत बिल्डर दांगट यांच्याकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी मोकळ्या जागेत मजुरांना राहण्यासाठी सीमाभिंतीलगत सहा ते सात झोपड्या आहेत. त्यामध्ये 16 कामगार राहत होते. या झोपड्यांवर सीमाभिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार 1 जुलै रोजी घडला.   बांधलेल्या भिंत धोकादायक आहे का नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी बिराजदार याची होती. धोकादायक भिंत कोसळून प्राणांतीक धोका निर्माण होऊ शकतो याचीही जाणीव त्याला होती. त्याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिविड शेट्टी हे करित आहेत.    

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूCourtन्यायालयArrestअटक