Viva College server hacked, information theft | विवा महाविद्यालयाचे सर्व्हर हॅक, माहितीची चोरी 

विवा महाविद्यालयाचे सर्व्हर हॅक, माहितीची चोरी 

वसई : वसईतील विवा महाविद्यालयाचे संगणक सर्व्हर अज्ञाताकडून हॅक झाल्याची तक्रार कॉलेजचे आय.टी. विभागाचे प्राध्यापक ब्रिजेश जोशी यांनी विरार पोलिसांत केली आहे.
इतरही महाविद्यालयांतील संगणकातील सर्व्हर हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यानुसार विवा कॉलेजचे सर्व्हर हॅक प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.महाविद्यालयाच्या सर्व्हरवर  पॉपअप येत होता. ही माहिती कॉलेजच्या माहिती तंत्रज्ञान विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पाहिली. यावेळी संगणकाच्या सगळ्या फाइल्स एनक्रिप्ट झाल्याचे निदर्शनास आले. माहिती विभागप्रमुखांना देण्यात आली तेव्हा त्यांनी इंटरनेट जोडणी त्वरित काढण्याचे आदेश दिले.विभागप्रमुखांनी इतर मशिन्सवर बॅकअप असल्याचे निश्चित केले व वरिष्ठांना त्याची माहिती दिली.

Web Title: Viva College server hacked, information theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.