Coronavirus: मध्य आणि उत्तरप्रदेशला जाणाऱ्या 30 नागरिकांना विष्णूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:46 IST2020-04-13T19:46:19+5:302020-04-13T19:46:38+5:30
त्या नागरिकांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना सोशल डिस्टनसिंग बाबत व तोंडाला मास्क लावण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Coronavirus: मध्य आणि उत्तरप्रदेशला जाणाऱ्या 30 नागरिकांना विष्णूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
डोंबिवली: विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती सोमवारी मिळाल्यानुसार काही इसम कोपर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे रुळांवरून पायी चालत बेकायदेशीरपणे स्थलांतर करीत असल्याचे समजले.त्यावरून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता एकूण 30 लोक नेरुळ,नवी मुंबई येथून पायी चालत मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश येथे जाण्याकरिता निघालेले होते.
त्या नागरिकांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना सोशल डिस्टनसिंग बाबत व तोंडाला मास्क लावण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांचे खाण्याची व राहण्याची व्यवस्था करणेबाबत केडीएमसी 'ह'प्रभागक्षेत्र अधिकारी यांना पत्र व्यवहार करून माहिती देण्यात आली आहे.त्यानंतर केडीएमसी तर्फे सदर इसमांची राहण्या खाण्याची व्यवस्था कोपर गावतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पावशे यांचे कार्यालयात करण्यात आली आहे.