विरार पोलिसांनी ६ जुगारी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 00:14 IST2019-10-03T00:13:46+5:302019-10-03T00:14:01+5:30

विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली.

 Virar police arrest 6 gamblers | विरार पोलिसांनी ६ जुगारी पकडले

विरार पोलिसांनी ६ जुगारी पकडले

नालासोपारा : विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली. तर रोख रक्कमेसह जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाही जुगाऱ्यांना अटक केली.

विरार पूर्वेकडील जुने पोस्ट आॅफिसच्या बाजूला असलेल्या मथुरभाई गिरधरभाई चाळीतील गिरधरभाई मोहनलाल सोनी यांच्या मालकीच्या रूम नंबर ८ मध्ये काही जण पैशाने जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांना मिळाली. यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी टीम बनवून सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास धाड मारली. येथून पोलिसांनी जुगार खेळणाºया सहा जणांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये महेश देवचंद लाल (४८), भालचंद भगवान भोईर (५३), भालचंद्र केशव गावंड (४८), हितेश प्रवीणभाई कामदार (५०), मनोज गिरधर सोनी (४५) आणि गिरधरभाई सोहनलाल सोनी (७४) या ६ जणांचा समावेश आहे.

Web Title:  Virar police arrest 6 gamblers