शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याची दादागिरी! महिला अन् तिच्या मुलीला हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:16 IST

BJP Leader Bating Woman and her Daughter : व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिलेला मारहाण करताना दिसत आहे.

नवी दिल्ली - हरियाणाच्या फरीबाद जिल्ह्यामध्ये स्वतःला भाजपा नेता (BJP) सांगणाऱ्या एका व्यक्तीची दादागिरी पाहायला मिळाली आहे. त्याने महिला अन् तिच्या मुलीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भाजपाचा नेता म्हणवणाऱ्या व्यक्तीवर महिलेला मारहाण आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि आयपीसी कलम 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

अशोक गोयल असं या व्यक्तीच नाव असून हा व्यक्ती स्वतःला भाजपा नेता असल्याचं सांगतो. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तो महिलेला मारहाण करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे एका महिलेसोबत संबंध आहेत. तसेच तिच्या मुलीवरही या व्यक्तीची वाईट नजर होती. जेव्हा या महिलेने या गोष्टीचा विरोध केला तेव्हा त्याने महिलेला मारहाण केली. याशिवाय आपले अनेक मोठ्या नेत्यांसोबत संबंध असल्याचं सांगत फरीदाबादमध्ये कोणीही त्याचं बिघडवू शकत नाही,असंही त्यानं म्हटलं. महिलेच्या तक्रारीनंतर आता या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिला अशोक गोयलकडे काम करते. हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून महिला आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड करायचा. याच कारणामुळे महिलेच्या मुलीने ब्लेडनं आपली नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. आरोपी अशोक तिला इतर लोकांसोबतही संबंध ठेवण्यास सांगायचा. महिलेच्या मुलीने सांगितलं की आरोपी तिच्यासोबत आरोपी छेडछाड करायचा आणि नकार दिल्यास लाकडाने तसेच काठ्यांनी मारहाण करायचा. मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे. फरीदाबादमध्ये कोणीच त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही असं म्हणत सतत धमकी देत असे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"मी जीव द्यायला जातेय" म्हणत भाजपा खासदाराच्या सुनेनं केला आत्महत्येचा प्रयत्न; पतीवर केले गंभीर आरोप

लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपाचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर (Kaushal Kishore) यांच्या सुनेने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारांची सून अंकिता यांनी खासदारांच्या घराबाहेर आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अंकिता यांना रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येआधी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी जीव द्यायला जातेय" असं म्हटलं आहे.

अंकिता यांनी आपले पती आयुष यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्हिडीओमध्ये अंकिताने आपण आत्महत्या करायला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्या आपल्या स्कूटीने खासदारांच्या दुबग्गा येथील घरी पोहोचल्या. तिथे त्यांनी आपल्या हाताची नस कापून घेतल्याचं म्हटलं जात आहे. "मी कोणासोबत लढू शकत नाही कारण तुमचे वडील हे खासदार आहे. माझं कोणीच ऐकणार नाही. आजपर्यंत कोणीच तुम्हाला हात लावला नाही. मग मी कशी तुम्हाला मारू शकते" असं अंकिता यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaryanaहरयाणा