महिलेवर बलात्कार करून अश्लील फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:04 IST2019-08-23T16:03:04+5:302019-08-23T16:04:52+5:30
डी. एन. नगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

महिलेवर बलात्कार करून अश्लील फोटो व्हायरल!
मुंबई - शेजारच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यात आले. त्यानंतर ते व्हिडीओ व्हायरल करीत महिलेची बदनामी करणाऱ्या इसमाला डी. एन. नगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.
अशोक रामू कुशाले (४०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो एका नामांकित अभिनेत्याच्या बहिणीच्या घरी ड्राईव्हर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. डी. एन. नगर परिसरातच तो राहत असून त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. तसेच त्या स्थितीत त्याचे व्हिडीओ बनवत नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याविरोधात महिलेने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.