शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेस अमानुष मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 19:11 IST

प्रत्येक वेळी या महिलेच्या अंगात कुलदैवत आणण्यासाठी कोंडे आणि त्याची पत्नी या पीडित महिलेला वेताची काठी आणि आसुडाने अमानुष मारहाण करत होते.

ठळक मुद्देएकास अटक : अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी छळ पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

खेड शिवापूर : अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी कथित भगत व सासरच्या मंडळींकडून महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याचा प्रकार आर्वी (ता. हवेली) येथे झाला आहे. राजगड पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणारा भगत राजू कोंडे, त्याची पत्नी, पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव आणि राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी पुढाकार घेतला.एका विवाहित महिलेच्या अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी तिच्या सासरचे लोक तिला आर्वी येथील राजू कोंडे या भगताकडे वारंवार घेऊन येत होते. प्रत्येक वेळी या महिलेच्या अंगात कुलदैवत आणण्यासाठी कोंडे आणि त्याची पत्नी या पीडित महिलेला वेताची काठी आणि आसुडाने अमानुष मारहाण करत होते. या प्रकाराबद्दल या महिलेच्या माहेरच्या लोकांना समजले. त्यानंतर त्यांनी या पीडित महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर ‘अंनिस’च्या पुढाकाराने या पीडित महिलेच्या नातेवाइकांकडून राजगड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार राजगड पोलिसांनी सदर भगत राजू कोंडे, त्याची बायको, या पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कोळवडी येथील दादासो विठोबा यांना अटक करण्यात आली आहे. राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दरडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीसअधिकारी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक