शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 20:02 IST

दोन हजार ७७८ वाहन चालकांकडून १२ लाख ९३ हजारांचा दंड वसूल. सोशल डिस्टसिंगचे नियम धुडकावले

ठळक मुद्देमोटारसायकलीवरुन दोघांना जाण्यास मनाई असूनही मागे सर्रास एक किंवा दोन व्यक्तींना बसवून नेणा:या 202 चालकांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. भिवंडीतील कोनगावमध्ये सर्वाधिक 43 दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दोन दिवसांपूर्वीच वाहन चालकांना सामाजिक अंतर तसेच वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते.

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले सोशल डिस्टसिंगचे नियम धुडकावून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन हजार 728 वाहन चालकांकडून ठाणो शहर वाहतूक शाखेने तब्बल 12 लाख 93 हजारांचा दंड ई  चलनाद्वारे वसूल केला आहे. ही कारवाई मंगळवारी एकाच दिवसात केली असून 202 दुचाकींसह 245 वाहनेही जप्त केली आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दोन दिवसांपूर्वीच वाहन चालकांना सामाजिक अंतर तसेच वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने 28 जून पासून वाहतूक शाखेच्या ठाणो, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर विभागातील 18 पोलीस निरीक्षकांच्या पथकांनी विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला. 30 जून रोजी एकाच दिवसात विनापरवाना जादा प्रवाशांची वाहतूक करणारे तीन चाकी आठ टेम्पोवर ई चलनाद्वारे दोन हजार 800 रुपयांची कारवाई केली. तर चार चाकी 27 टेम्पो चालकांकडून 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 125 ट्रक चालकांकडून 28 हजार 700 चा दंड, सात खासगी रिक्षा चालकांकडून तीन हजार 700 रुपये, 174 खासगी कार 73 हजार 700 चा दंड तर 143 सार्वजनिक रिक्षा चालकांकडून 67 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पर्यटनाच्या 29 बस चालकांकडून 10 हजार 900 इतका दंड तर तब्बल दोन हजार 150 मोटारसायकल चालकांकडून दहा लाख 73 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण दिवसभरात अशा दोन हजार 728 चालकांकडून 12 लाख 93 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रंनी दिली.दरम्यान, मोटारसायकलीवरुन दोघांना जाण्यास मनाई असूनही मागे सर्रास एक किंवा दोन व्यक्तींना बसवून नेणा:या 202 चालकांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. भिवंडीतील कोनगावमध्ये सर्वाधिक 43 दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ कल्याणमध्ये 37 आणि भिवंडीत 17 दुचाकी जप्त केल्या आहेत.त्याचप्रमाणो दोन पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 31 रिक्षाही जप्त करण्यात आल्या आहेत. यात मुंब्रा येथून सर्वाधित सात तर कापूरबावडी आणि कोळसेवाडी येथून प्रत्येकीसहा रिक्षा जप्त केल्या आहेत. अशाच प्रकारे दोन पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 12 मोटारकारही जप्त केल्या आहेत. वागळे इस्टेटमध्ये सर्वाधिक पाच कार जप्त केल्या आहेत.

‘‘ यापुढे 31 जुलैपर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक रस्त्यावर सायकल, मोटारसायकल, रिक्षा, मोटारकार आणि मोठी वाहने अशा सर्वच वाहनांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बंदी करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक करणा:यांवरही कारवाई केली जाईल.’’अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

 

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

 

लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसthaneठाणे