Video : मद्यधुंद तरुणीने घातला गोंधळ, रस्त्यावर केली शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:40 IST2021-09-03T15:36:53+5:302021-09-03T15:40:27+5:30
ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याने अनेक जणांनी बघ्याच्या भूमिका घेतली होती.

Video : मद्यधुंद तरुणीने घातला गोंधळ, रस्त्यावर केली शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल
अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पुला जवळून जाणाऱ्या डिपी रस्त्यावर रात्री एका मद्यधुंद तरुणीचा गोंधळ पाहायला मिळाला. ही मद्यधुंद अवस्थेत असलेली तरुणी रस्त्याच्या मधोमध उभी राहून भरधाव वाहने अडवून वाहन चालकांना अश्लील शिवीगाळ करत होती. या तरुणीचा व्हिडिओ सध्या अंबरनाथमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर प्रकार जवळ पास एक तास सुरू होता. ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याने अनेक जणांनी बघ्याच्या भूमिका घेतली होती.
काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना फोन केला मात्र पोलीस येण्या आधीच सदर तरुणी मित्राच्या गाडीवर बसून निघून गेली. रात्रीच्या सुमारास या रस्त्यावर वारंवार असे प्रकार घडत असल्याने भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडु नये याकरिता सदरील ठिकाणी पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
अंबरनाथ येथे मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर गोंधळ घालतानाचा व्हीडीओ व्हायरल pic.twitter.com/WJdYmy85tC
— Lokmat (@MiLOKMAT) September 3, 2021