Video : थरारक! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:53 IST2021-07-19T16:47:44+5:302021-07-19T16:53:05+5:30
Sword Attacke on Advocate : याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Video : थरारक! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार
१० ते १५ जणांच्या टोळक्याने बोरिवलीत भररस्त्यात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. आरोपी भररस्त्यात वकिलावर तलवारीने सपासप वार करून पळ काढतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सत्यदेव जोशी असं जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
थरार! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार pic.twitter.com/xCxSJ21MuH
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अधारे पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली असून तीन जणांना अटक केली आहे. एमएचबी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
थरार! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार pic.twitter.com/YH0WmtCmXr
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021