गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील मोडासा लुनावाडा रस्त्यावर हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कारनेबाईकला धडक दिली आणि बाईकस्वाराला सुमारे दीड किलोमीटर फरफटतं नेलं. पोलिसांनी मद्यधुंद चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या मद्यधुंद भावाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातानंतरही कार चालक थांबला नाही, उलट तो मुख्य महामार्गावर वेगाने बाईकस्वाराला फरफटत घेऊन गेला. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने याचा व्हिडीको काढला जो आता व्हायरल झाला आहे. लोकांनी कार चालकाला पकडलं आणि लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
बाकोर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मद्यधुंद चालक मनीष पटेल आणि त्याचा भाऊ मेहुल पटेल यांना ताब्यात घेतलं. त्यांनी कार जप्त केली आणि ती बाकोर पोलीस ठाण्यात आणली. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये ५० वर्षीय दिनेशभाई आणि २१ वर्षीय सुनील यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी लुनावाडा सिव्हिल हॉस्पिटल आणि गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
महिसागरचे पोलिस उपअधीक्षक कमलेश वसावा यांनी सांगितलं की, पोलीस कठोर कारवाई करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी करण्यासाठी एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीमला बोलावलं आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कार चालक मनीष पटेल यांचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रोसेस सुरू केली आहे.
Web Summary : In Gujarat, a drunk driver hit a biker and dragged him for 1.5 km. Police arrested the driver and his brother. Two people were seriously injured and hospitalized. Police seized the car and initiated license cancellation.
Web Summary : गुजरात में एक नशे में धुत ड्राइवर ने बाइक सवार को टक्कर मार दी और उसे 1.5 किमी तक घसीटा। पुलिस ने ड्राइवर और उसके भाई को गिरफ्तार किया। दो लोग गंभीर रूप से घायल होकर अस्पताल में भर्ती हैं। पुलिस ने कार जब्त कर लाइसेंस रद्द करने की प्रक्रिया शुरू कर दी है।