कर्नाटकातील हनसूरमध्ये सराफा दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. शस्त्र घेऊन दुकानात घुसलेल्या पाच चोरांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील दागिने घेऊन फरार झाले. रविवारी ही घटना घडली. दरोड्याची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनसूरमधील बायपास रोडवरील सराफा दुकानात ही घटना घडली. स्काय गोल्ड आणि डायमंट ज्वेलरी शॉपमध्ये दुपारी २ वाजता पाच चोरांनी दरोडा टाकला. अवघ्या चार मिनिटांत पाच चोर साडेचार कोटींचे दागिने घेऊन पसार झाले.
दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
चार मिनिटाच्या काळातच पाच सशस्त्र चोरांनी ही लूट केली. तीन चोर हेल्मेट घालून, तर दोघे तोंडावर मास्क लावून दुकानामध्ये घुसले होते.
पोलीस अधीक्षक एन. विष्णूवर्धन यांनी सांगितले की, दोन चोरांच्या दोन्ही हातात बंदुका होत्या. तर इतर तिघांच्या हातात प्रत्येकी एक बंदूक होती. चोरांनी रोख रक्कम किंवा चांदीचे दागिने नेले नाही. त्यांनी फक्त सोन्याचे दागिनेच नेले. दुकानातून बाहेर पडताना त्यांनी हवेत गोळीबार केला आणि पाठलाग केला तर जीवे मारू अशी धमकी दिली होती.
चोरांचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. ज्यावेळी दरोडा पडला, त्यावेळी दुकानामध्ये २० ते २५ कर्मचारी कार्यरत होते. रविवार असल्याने दुकानात ग्राहकांची संख्याही जास्त होती, असेही पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Five armed robbers looted a jewelry store in Hunsur, Karnataka, stealing approximately 4.5 crore rupees worth of gold. The entire incident, where employees were threatened, was captured on CCTV. Police are investigating the brazen daylight robbery.
Web Summary : कर्नाटक के हनसूर में एक ज्वेलरी शॉप में पांच सशस्त्र लुटेरों ने धावा बोला और लगभग 4.5 करोड़ रुपये का सोना लूट लिया। कर्मचारियों को बंदूक दिखाकर धमकाया गया। पूरी घटना सीसीटीवी में कैद हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है।