Video : कार्यालयातून केला मोबाईल लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 22:57 IST2022-03-03T20:40:37+5:302022-03-03T22:57:11+5:30
Mobile Robbery Case : मोबाईल चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Video : कार्यालयातून केला मोबाईल लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवलीः येथील पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील सरोजा आरकेड संकुलामधील जिओजित फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या सविता माहे यांचा मोबाईल अनोळखी व्यक्तीने कार्यालयातून चोरी केल्याची घटना आज सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली.
मोबाईल चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोबाईल चोरणा-या अनोळखी व्यक्तीच्या तोंडावर मास्क होता आणि त्याच्या हातात काही पेपर होते. काही पेपर समोरील व्यक्तीला देत उर्वरित पेपर टेबलावरील मोबाईलवर ठेवले आणि पेपरमध्ये मोबाईल दडवून तो कार्यालयाबाहेर पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले आहे.
डोंबिवलीत कार्यालयातून केला मोबाईल लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/pl1D4JKwaQ
— Lokmat (@lokmat) March 3, 2022