शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पतीच्या क्रूरतेचा VIDEO, दारुड्याने मारहाण करून पत्नीचा हात तोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:31 IST

Husband Assaults Wife : शरीरावर काळया - निळ्या रंगाच्या खुणा आहेत. ही महिला या पुरुषाची पत्नी आहे. पीडित रोशनी देवी हिचा विवाह दीपकसोबत २०१० मध्ये झाला होता.

अलीगढच्या नाडा बाजीदपूर गावातून एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक पुरुष जमिनीवर पडलेल्या महिलेवर एकामागून एक हल्ला करत आहे. हा पुरुष महिलेला जबर मारहाण करत आहे. मारहाणीमुळे महिलेच्या एका हाताला फ्रॅक्चर झाले. शरीरावर काळया - निळ्या रंगाच्या खुणा आहेत. ही महिला या पुरुषाची पत्नी आहे. पीडित रोशनी देवी हिचा विवाह दीपकसोबत २०१० मध्ये झाला होता.या मारहाणीचा व्हिडिओ शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. रोशनीने सांगितले की, पतीला दारू पिण्याचे व्यसन आहे. दररोज तो दारूच्या नशेत घरी येतो आणि तिला मारहाण करतो. पतीचे घरचे लोक त्याला माझ्याविरुद्ध भडकवतात. रोशनीच्या हाताला फ्रॅक्चर झाले. पती रोशनीला मारहाण करत असताना ती सासरच्या मंडळींना वाचवण्यासाठी विनवणी करत होती, मात्र कोणीही मदतीला आले नाही.

ही घटना 30 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. दारूच्या नशेत दीपक घरी पोहोचला आणि दरवाजा बंद करून रोशनीला पट्ट्याने मारहाण करू लागला. रोशनी देवीने तिला सासरच्यांपासून वाचवण्यासाठी लाख विनंत्या केल्या, पण कोणीही तिला वाचवायला आलं नाही.हाताचे हाड तुटलेरोशनीचे माहेरची मंडळी दुसऱ्या दिवशी तिच्या सासरच्या घरी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आरोपी दीपक तेथून पळून गेला होता. नियंत्रण कक्षाच्या माहितीवरून डायल 112 वर नियंत्रण कक्षास माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचला आणि पीडित महिलेला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी रोशनी देवी यांचे जिल्हा रुग्णालयात मेडिकल केले. तपासादरम्यान रोशनी देवीचा हात मोडल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा दीपकने तिला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी शेजाऱ्याने मोबाईलवरून व्हिडिओ बनवला होता. पोलिसांनी या प्रकरणी व्हिडिओचा आधार घेतला आहे.

पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप

एसएसपींना विनंती केलीरोशनी देवी यांनी सांगितले की, या व्हिडिओसह त्यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली, परंतु 2 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी दीपकवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पीडितेने गुरुवारी एसएसपीकडे तक्रार करून न्याय मागितला. त्यानंतर संध्याकाळी उशिरा सीओ फर्स्ट अशोक कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDomestic Violenceघरगुती हिंसा