Video : माझी आई घरी आजारी आहे, पण...; मुंबई पोलिसांची अगतिकता व्हिडीओतून व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 13:42 IST2020-03-30T23:36:18+5:302020-03-31T13:42:34+5:30
लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक भावनिक व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर जारी करण्यात आला आहे.

Video : माझी आई घरी आजारी आहे, पण...; मुंबई पोलिसांची अगतिकता व्हिडीओतून व्यक्त
मुंबई - कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पोलीस यंत्रणेने मात्र कंबर कसली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबईपोलिसांकडून एक भावनिक व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर जारी करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या दाहशतीत रस्त्यावर उतरून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यासाठी कुठे पोलीस गाणी गातोय तर कुठे हात जोडून विनंती करतोय. अशा प्रतिकूल परिस्थितही मुंबईकरांच्या रक्षणासाठी आपलं घरदार, मुलं बाळ, आई वडील घरात सोडून मुंबई पोलीस कशाप्रकारे पहारा देत आहेत, हे या व्हिडिओतून दाखवून लोकांना घरीच बसण्यासाठी भावनिक साद घातली आहे. तसेच करोना व्हायरसचा पराभव करण्यात मदत करा. आम्हाला घरी सुरक्षित परत जाण्यास मदत करा, अशी कळकळीची विनंती देखील मुंबईकरांना करण्यात पोलिसांकडून करण्यात आली आहे.
हाती दंडुका घेऊन, आज पडलो बाहेर !
मुलंबाळ, परिवार सारा घरीच राहिला !!
सारी मुंबापुरी माझी, आता माझा परिवार !
तुम्ही माझेच कुटुंब, रस्ता माझे घरदार !!
कृपया, घरी रहा! असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
#MumbaiFirst#StayHomeStaySafe#TogetherWeFightCorona#TogetherWeCanpic.twitter.com/dBTEaSCq7a
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 30, 2020