Video: Money again seized millions of money from Mumbai | Video : पुन्हा मुंबईतून लाखोंची रक्कम जप्त
Video : पुन्हा मुंबईतून लाखोंची रक्कम जप्त

ठळक मुद्दे 7 लाख 84 हजार 500 रुपयांची संशयीत रक्कम पकडली असून याबाबत व्ही.पी.रोड पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने 19 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास गोल देऊळ, व्ही.पी. रोड, मुंबई येथे मारुती सियाज या मोटार कारची (एम.एच.03 सी.एम.8928) तपासणी केली

मुंबई - मुंबई शहर जिल्हयात गोल देऊळ भागात काल सायंकाळी निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाव्दारे 7 लाख 84 हजार 500 रुपयांची संशयीत रक्कम पकडली असून याबाबत व्ही.पी.रोड पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत. तसेच सायन येथील मच्छी मार्केटनजीक परिसरातून आज ३ लाख ४० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. 

याबाबतची अधिक माहिती अशी निलेश नाईक यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने 19 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास गोल देऊळ, व्ही.पी. रोड, मुंबई येथे मारुती सियाज या मोटार कारची (एम.एच.03 सी.एम.8928) तपासणी केली असता सदर वाहनामध्ये वत्सल धर्मेश शाह याच्यांकडे 7 लाख 84 हजार 500 रुपये रक्कम आढळून आली. सदर रोख रक्कमेबाबत योग्य स्पष्टीकरण तसेच कागदपत्र सादर करु न शकल्याने ही रक्कम ताब्यात घेण्यात आलेली आहे. याबाबत व्ही.पी.रोड पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती 31- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. 


Web Title: Video: Money again seized millions of money from Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.