भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील घटनेत जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 21:04 IST2021-07-03T21:02:57+5:302021-07-03T21:04:17+5:30
Bhiwandi News : पोलिसांनीच सदर व्यक्तीस चौथ्या मजल्याच्या खिडकीतून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील घटनेत जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल
भिवंडी - गुजरात राज्यातील वापी पोलीस ठाण्यात चोरी व इतर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जमील कुरेशी ( वय ३८ , रा. कसाई वाडा ) याच्या मुसक्या आवळण्यासाठी आलेल्या गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना हुलकावणी देत जमील याने इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारल्याने यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील निजामपुरा कसाई वाडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडली आहे.
पोलिसांनीच सदर व्यक्तीस चौथ्या मजल्याच्या खिडकीतून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे येथील जमावाने कारवाईसाठी अलेल्या पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस चौकशी करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.