Video - भयंकर! अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी; एकमेकांचा गळा दाबत होते लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 08:21 IST2022-04-04T08:19:28+5:302022-04-04T08:21:30+5:30
Firing In US : भीषण गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून 9 जणं जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली.

Video - भयंकर! अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी; एकमेकांचा गळा दाबत होते लोक
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सॅक्रामेंटोंमध्ये एका गर्दीच्या भागात गोळीबार करण्यात आला आहे. या भीषण गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून 9 जणं जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गोळीबार झाला. या गोळीबारात तब्बल 15 जणं जखमी झाल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
अमेरिकेतील या धक्कादायक घटनेचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावरुन धावताना दिसत होते. तर बॅकग्राऊंडमध्ये गोळीबाराचा आवाज येत होता. व्हिडीओमध्ये घटनास्थळी रुग्णवाहिका जाताना दिसत आहे. पोलिसांनी घटनेबाबत माहिती दिली. तसेच घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
BREAKING:🚨 USA: Multiple people k!IIed and injured in mass shooting incident in downtown Sacramento, California; sound of automatic gunfire captured on amateur video pic.twitter.com/aHwco0UZG6
— OSINT Updates 🚨 (@OsintUpdates) April 3, 2022
अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना समोर येतात. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून 9 जणं जखमी झाले आहेत. ही एक मोठी घटना आहे. तर दुसऱ्या एका ट्विटरवरील व्हिडीओमध्ये लोक एकमेकांना गळा दाबताना दिसत आहे आणि एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. यादरम्यान काही जणं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडीओच्या बॅकराऊंडमध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.
यापूर्वी गुरुवारी घरगुती वाद सोडवण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांनी एका अधिकाऱ्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. याशिवाय दोन अन्य अधिकारीही जखमी झाले होते. लेबनानमधअये मेअर शेरी कॅपेलोने सांगितलं की, गोळीबाराची सूचना मिळाल्यानंतर दुपारी साधारण साडे तीन वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचली. तेथे तीन अधिकारी जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.