ठळक मुद्देआरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहेत. तर आज दुपारी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी गंभीर आरोप करत सूचक इशारा दिला आहे.
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला
आज तक्रारदार महिलेने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला असून त्यादरम्यान त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पोलिसांबाबत नाराजी वर्तवत सांगितले की, चार दिवसांपासून आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलीस ठाण्यात पुढे काही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. उच्च स्थरीय लोकांना तक्रार केल्यानंतर मुंडेंनी याबाबत खुलासा केला. रेणूविरोधात ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत करोडो रुपयांची खंडणी उकळण्याबाबत खोटे आरोप केले आहेत. माझ्या अपक्षकाराची काहीच संपत्ती नाही. ती स्वतः पीजीमध्ये राहते, त्याचे भाडे १० हजार ते १५ हजार आहे. त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाही, उदरनिर्वाहासाठी त्यांनी दागिने देखील विकले. तसेच असे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत, ते उघड झाल्यानंतर लोकांची तोंडं बंद होतील, असा इशारा देखील त्रिपाठी यांनी मुंडेंना दिला. त्याचप्रमाणे आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे.
Read in English
Web Title: Video: If the video is exposed, the mouths will be silent, the complainant woman gave a warning
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.