Video : दक्ष नागरिकांचा अमली पदार्थ विक्रेत्यांना दिला चोप; नालासोपारा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:17 IST2019-01-31T19:15:45+5:302019-01-31T19:17:49+5:30
नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली

Video : दक्ष नागरिकांचा अमली पदार्थ विक्रेत्यांना दिला चोप; नालासोपारा येथील घटना
नालासोपारा - तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्ष नागरिकांनी पाळत ठेवून दोन अमली पदार्थ विक्रेत्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळींज परिसरातील अंबावाडी भागात सर्रास खुलेआम अमली पदार्थ विकले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. यावर पोलीस कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी स्वत: अमली पदार्थ विक्रेत्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि पळत ठेवली. दरम्यान, आज यातील दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. यानंतर या दोघांना नागरिकांनी तुळींज पोलिसांच्या हवाली केले. हे दोघे भामटे परिसरातील महिलांची छेद काढणे, मोबाईल चोरी करणे आणि अमली पदार्थ विकणे अशा समाज विघातक घटनांमध्ये सामील असत.