शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Video : तिवसा येथे जंगलाला आग;आग विझविण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:22 IST

Fire in Forest : तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती.

ठळक मुद्देही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

सुरज दाहाटतिवसा -   अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी,सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतची नवीन अग्निशमन दलाची गाडीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात नगरपंचायतचे तीन कर्मचारी या आगीत किरकोळरित्या जखमी सुद्धा झालेत, तर ही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती. ती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. तर ही आग अनियंत्रित झाल्याने आग विझविण्यासाठी ही गाडी आली होती. मात्र ही आग विझविण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडीच जळून खाक झाली,यावेळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे सह उपस्थित होते.

तिवसा नगर पंचायत चे अग्निशमन वाहन जळून खाक , वनविभागाच्या जागेतील आग गावात शिरू नये यासाठी आग आटोक्यात आणताना गाडी ला च आग लागली आणि हा दुर्दैवी अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी नाही पण तिवसा तालुक्यातील व शहरातील आगीच्या १२ घटना या वाहनाने निस्तरल्या होत्या. अजूनही कायमस्वरूपी पदभरती, पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्हा प्रशासन व नगर विकास शाखेने या वाहनांवर कंत्राटी पद्धतीचे सुद्धाने भरले गेले नाही. एक वर्षांपूर्वीच सदर अग्निशमन वाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर , जिल्हानियोजन समिती व नगर पंचायत मार्फत प्राप्त झाले होते. तालुक्याच्या ठीकाणी अंत्यत आवश्यक असलेले हे वाहन आज जळून खाक झाले. ज्या अधिग्रहित विहीरिवरून तिवसा शहराला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीवरून अग्निशमन , पाणी टँकर, व पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन समितीने २४ तास वीज पुरवठा चे काम मंजूर झाले आहे पण काही शेतकऱ्यांनी हे काम महिन्याभरापासून थांबवून ठेवले आहे त्यामुळे तिवसा शहराला पाणी टंचाई , अग्निशमनला पाणीपुरवठा या बाबींना अडचण निर्माण होत आहे हे विशेष. 

टॅग्स :fireआगforestजंगलPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलAmravatiअमरावती