Video : चारकोप येथील रबर कंपनीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 15:48 IST2019-01-11T15:46:18+5:302019-01-11T15:48:28+5:30
रबरची कंपनी असल्याने आगीचे वेगाने पेट घेतला आहे. या आगीत आर्थिक नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Video : चारकोप येथील रबर कंपनीला आग
ठळक मुद्देहिंदुस्थान नाका येथील पटेल रबर वर्क्स या कंपनीला आग लागली आहे. तळमजल्यावरील १ हजार चौरस फूट जागी असलेल्या प्लास्टिक भंगार, रबर, चढया, लाकडी सामान, गारमेंटचे कपडे आणि इलेक्ट्रिक वायर जाळून खाक झाल्या आहेत.
मुंबई - मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. कांदिवली पश्चिमेकडील हिंदुस्थान नाका येथील पटेल रबर वर्क्स या कंपनीला आग लागली आहे. आज दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. तळमजल्यावरील १ हजार चौरस फूट जागी असलेल्या प्लास्टिक भंगार, रबर, चढया, लाकडी सामान, गारमेंटचे कपडे आणि इलेक्ट्रिक वायर जाळून खाक झाल्या आहेत. रबरची कंपनी असल्याने आगीचे वेगाने पेट घेतला आहे. या आगीत आर्थिक नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.