Video : खळबळजनक! लॉकडाऊनचे उल्लंघन, वाधवान कुटुंबीय पोचले महाबळेश्वरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 11:16 PM2020-04-09T23:16:13+5:302020-04-09T23:30:09+5:30

डीएचएफएलच्या वाधवान कुटुंबियांचे २३ सदस्य यांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला.

Video: a family member of Yes Bank scam went to Mahabaleshwar in lockdown pda | Video : खळबळजनक! लॉकडाऊनचे उल्लंघन, वाधवान कुटुंबीय पोचले महाबळेश्वरला

Video : खळबळजनक! लॉकडाऊनचे उल्लंघन, वाधवान कुटुंबीय पोचले महाबळेश्वरला

googlenewsNext
ठळक मुद्देमहाबळेश्वरला जाण्यासाठी त्यांना गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवांचे पत्र परवानगी म्हणून मिळाल्याने आखणीच चर्चेला उधाण आले आहे.लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या या २३ जणांविरुद्ध महाबळेश्वर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला पोचल्याने एकाच खळबळ माजली आहे. महाबळेश्वरला जाण्यासाठी त्यांना गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र परवानगी म्हणून मिळाल्याने आणखीच चर्चेला उधाण आले आहे.

डीएचएफएलचे कपिल वाधवान कुटुंबियांचे २३ सदस्य यांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. याला कशी परवानगी देण्यात आली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या या २३ जणांविरुद्ध महाबळेश्वर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जिल्ह्याची सीमा ओलांडण्यास देखील मनाई आहे. असे असून देखील या कुटुंबातील २३ जणांनी कशी काय ट्रिप केली, याची सखोल चौकशी होणार आहे. 

Web Title: Video: a family member of Yes Bank scam went to Mahabaleshwar in lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.