नवरात्रोत्सवादरम्यान सूरत शहरातील डुमास पोलीस स्टेशन परिसरातील वायपीडी डोम येथे आयोजित गरबा कार्यक्रमात पोलिसांनी एका खोट्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. युवराज नारू राठोड असं अटक करण्यात आलेला व्यक्तीचं नाव असून गेल्या दोन दिवसांपासून तो वॉकी-टॉकी घेऊन गरब्यासाठी व्हीआयपी गेटमधून प्रवेश करत होता.
सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो आतमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून आलं आहे. आयोजकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन त्याची चौकशी केली तेव्हा त्याने स्वतः पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगितलं आणि अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांना ओळखत असल्याचं म्हटलं.
युवराजच्या मोबाईलमध्ये पोलिसांना त्याचे सेलिब्रिटी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे असंख्य फोटो सापडले. तपासात असं दिसून आलं की, त्याचे वडील हिरे व्यापारी आहेत. युवराजने हॉटेल मालक असलेल्या एका मित्राकडून वॉकी-टॉकी उधार घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज राठोडची वागणूक पूर्णपणे फिल्मी होती. त्याने पोलिसांच्या शैलीत मिशा आणि हेअरस्टाईल देखील केली होती. गेल्या दोन दिवसांपासून, तो गरब्यामध्ये घुसत होता, व्हीआयपी सारखी ऐटीत एन्ट्री करत होता आणि सेलिब्रिटींसोबत फोटो काढत होता. आयोजक नयन मंगरोलिया यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी युवराज राठोडविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
Web Summary : A man posing as a police officer was arrested at a Surat Garba event. He gained VIP access using a walkie-talkie. Suspicious organizers alerted police, revealing his deception. The imposter had photos with celebrities and officials. He borrowed the walkie-talkie from a friend.
Web Summary : सूरत में गरबा कार्यक्रम में पुलिस अधिकारी बनकर प्रवेश करने वाला एक व्यक्ति गिरफ्तार। उसने वीआईपी एक्सेस के लिए वॉकी-टॉकी का इस्तेमाल किया। आयोजकों को संदेह हुआ तो पुलिस को सूचना दी, जिससे उसका धोखा उजागर हुआ। आरोपी के पास सेलिब्रिटी और अधिकारियों के साथ तस्वीरें थीं। उसने एक दोस्त से वॉकी-टॉकी उधार ली थी।