Video : मद्यधुंद तरुणीने पोलिसावर लाथ उगारली अन् पकडली, भररस्त्यात केला तमाशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:42 IST2022-06-20T19:42:32+5:302022-06-20T19:42:55+5:30
Drunken Women abuse Police : सानपाडा येथील प्रकार, पोलिसांसोबत अश्लील चाळ्यासह केली शिवीगाळ

Video : मद्यधुंद तरुणीने पोलिसावर लाथ उगारली अन् पकडली, भररस्त्यात केला तमाशा
नवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने भरस्त्यात तमाशा केल्याचा प्रकार तीन महिन्यांनी व्हायरल व्हिडीओमुळे प्रकाशात आला आहे. ओला चालकाने भाडे नाकारल्याने या तरुणीने त्याच्या कारचा ताबा घेऊन रस्त्यात धिंगाणा घातला. शिवाय पोलीस घटनास्थळी येताच अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत देखील अश्लील चाळे या तरुणीने केले.
शहरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या बॅचलर तरुण तरुणींचे प्रमाण वाढत आहे. मद्यपान, धूम्रपान करून रात्री अपरात्री वावरणे हे देशाच्या काना कोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या दृष्टीने मॉडर्न कल्चर समजले जात आहे. त्यानुसार शहरातील पब, लाउंज याठिकाणी अशा तरुणांची गर्दी पहायला मिळते. अशाच गर्दीतून मद्यधुंद होऊन आलेल्या तिघा तरुणींचे भाडे ओला चालकाने नाकारले. यावरून स्वतःवरील नियंत्रण हरवलेल्या तरुणीने ओला चालकाला धमकावून त्याच्या कारचा ताबा मिळवला.
A thread of 11 videos, drunk girl abusing everyone including Police
— Kungfu Pande 🇮🇳2.0 (@pb3060) June 19, 2022
Video 1 pic.twitter.com/SC4AGM7h5j
Video 2 pic.twitter.com/GAgxVifzV7
— Kungfu Pande 🇮🇳2.0 (@pb3060) June 19, 2022
त्यानंतर या तरुणीने भरस्त्यात आरडा ओरडा करत परिसराची शांतता भंग केली. याबाबत पोलिसांना कळले असता पोलिसही त्याठिकाणी धडकले. परंतु मद्यधुंद अवस्थेतील या तरुणीने पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील अश्लील चाळे करत धक्काबुकी केली. हा प्रकार मार्च महिन्यात सानपाडा येथे पामबीच मार्गालगत घडला आहे. याप्रकरणी तिच्यावर कारवाई देखील करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी रात्रीपासून पुन्हा या प्रकरणातील तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे हा प्रकार पुन्हा प्रकाशात आला आहे.
Video 5 pic.twitter.com/2uZwNlQ17U
— Kungfu Pande 🇮🇳2.0 (@pb3060) June 19, 2022
Video 8 pic.twitter.com/bS1ZVP4Jzq
— Kungfu Pande 🇮🇳2.0 (@pb3060) June 19, 2022