शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Video: दिवसाढवळ्या कार अडवली, दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर 'बॅग' पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 16:22 IST

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी दिवसाढवळ्या बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर, याप्रकरणातील आरोपी अतिक अहमद व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. मात्र, रुग्णालयातून नेताना त्यांची मीडियासमोरच हत्या करण्यात आली होती. या घटनांवरुन काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युपीतील योगी सरकावर निशाणा साधला. तर, गुन्हेगारी वाढत असल्यावरुन मोदी सरकावरही सातत्याने टीका केली जात आहे. काँग्रेसने आता राजधानी दिल्लीत दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्याच्या घटनेवरुन गृहमंत्री अमित शहांना सवाल केलाय.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिवसाढवळ्या राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानच्या टनेलमध्ये घुसून एका कारची लूट करण्यात आल्याचे दिसून येते. दोन बाईकवरुन ४ जण एका चारचाकी गाडीला अडवतात. त्यानंतर, बंदुकीचा धाक दाखवून गाडीतील प्रवाशांकडून एक बॅग लूटत असल्याचे सीसीटीव्हीच्या व्हिडिओत दिसत आहे. बाईकस्वारांनी हेल्मेट घातल्याचेही व्हिडिओत दिसून येते.  या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना मेन्शन करुन प्रश्न विचारला आहे. हे काय चाललंय, तुम्ही पाहताय ना? असा सवाल अमित शहांना विचारण्यात आलाय. दरम्यान, दरोडेखोरांनी या कारमधील प्रवाशांकडून २ लाख रुपये लुटल्याचेही काँग्रेसने ट्विटमध्ये सांगितलंय.

टॅग्स :congressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmit Shahअमित शाह