Video : आंटी म्हणणं पडलं महागात, करवाचौथच्या खरेदीदरम्यान महिलांनी मुलीला झिंझ्या पकडून मारले
By पूनम अपराज | Updated: November 3, 2020 20:45 IST2020-11-03T20:43:49+5:302020-11-03T20:45:28+5:30
Girl Assaulted : करवाचौथनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या महिलांनी एका मुलीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

Video : आंटी म्हणणं पडलं महागात, करवाचौथच्या खरेदीदरम्यान महिलांनी मुलीला झिंझ्या पकडून मारले
उत्तर प्रदेशमधील एटा येथे करवाचौथसाठी खरेदीसाठीही महिलांची झुंबड उडाली आहे. ४ नोव्हेंबरला करवाचौथ असून महिला बुधवारी त्याच व्रत करणार आहे. यानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. मात्र या खरेदीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, बाजारात एका मुलीने महिलेला आंटी म्हटल्याने खूप महागात पडलं. महिलांनी तिच्या झिंझ्या पकडून मारलं आणि जोरदार भांडण केल्याचा व्हिडीओ लाइव्ह हिंदुस्तानने शेअर केला आहे.
करवाचौथनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या महिलांनी एका मुलीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीने संबधित महिलेला आंटी म्हणून हाक मारल्याने तिला मारहाण करण्यात आली. आंटी असं म्हटल्याने संतापलेल्या महिलेने सोबत असलेल्या महिलांच्या मदतीने मुलीचे केस पकडून मारहाण करायला सुरुवात केली, सोमवारी उशिरा एटा इथे एका दुकानात काही महिला खरेदी करत होत्या. त्यावेळी एका मुलीने महिलेला आंटी म्हणून हाक मारली. त्यानंतर चिडलेल्या महिलेने मुलीशी वाद घातला. दोघांमधील वाद विकोपाला गेला की मुलीला मारहाण करण्यात आली, शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
यूपी के एटा में आंटी कहने पर भड़की महिला, करवा चौथ की खरीददारी छोड़ बाल पकड़कर पीटा#UttarPradeshpic.twitter.com/yIr9werUzW
— Hindustan (@Live_Hindustan) November 3, 2020