Video : कोलकात्यात हत्येचा गुन्हा करून मुंबईत लपलेल्या आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 21:19 IST2019-03-06T21:09:38+5:302019-03-06T21:19:37+5:30

आरोपी शेख याला सापळा रचून अँटॉप हिल परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Video: The accused arrested in Mumbai who had murder offence in Kolkata | Video : कोलकात्यात हत्येचा गुन्हा करून मुंबईत लपलेल्या आरोपीस अटक

Video : कोलकात्यात हत्येचा गुन्हा करून मुंबईत लपलेल्या आरोपीस अटक

ठळक मुद्देदालिम अलाउद्दीन शेख (६५) असे त्याचे नाव आहे. बेहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या करून फरार झालेला शेख हा वडाळा परिसरातील बंगालीपुरामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती कोलकाता पोलिसांना मिळाली होती.

मुंबई - हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला कोलकाता पोलिसांनी वडाळा पोलिसांच्या मदतीने आज अटक केली. दालिम अलाउद्दीन शेख (६५) असे त्याचे नाव आहे. मुर्शिदाबाद (कोलकाता) येथील बेहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या करून फरार झालेला शेख हा वडाळा परिसरातील बंगालीपुरामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती कोलकाता पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वडाळा पोलिसांकडे मदत घेतली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर राऊत, राजाराम पांगारे, निलेश चौधरी, सुशांत टिळक, देविदास पगारे आणि सुहास कांबळे यांनी आरोपी शेख याला सापळा रचून अँटॉप हिल परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Video: The accused arrested in Mumbai who had murder offence in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.