अत्याचारानंतर पीडितेला गर्भनिरोधकाच्या गोळ्या खाण्यास पाडले भाग, चौघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: April 27, 2023 16:09 IST2023-04-27T16:09:14+5:302023-04-27T16:09:24+5:30

पीडितेच्या आईने दिली फिर्याद

Victim forced to take birth control pills after torture, crime against four | अत्याचारानंतर पीडितेला गर्भनिरोधकाच्या गोळ्या खाण्यास पाडले भाग, चौघांवर गुन्हा

अत्याचारानंतर पीडितेला गर्भनिरोधकाच्या गोळ्या खाण्यास पाडले भाग, चौघांवर गुन्हा

रुपेश हेळवे, सोलापूर: सतरा वर्षीय पीडित मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भ निरोधकाच्या गोळ्या दिल्याप्रकरणी चार जणांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.

आरोपी मुलाने पीडितेला तुझ्यावर माझे प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगत पीडितेला लॉजवर नेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर तिला दमदाटी देऊन गर्भनिरोधकाच्या गोळ्या खाण्यास भाग पाडले. पीडितेने गोळ्या खाल्यानंतर ते गर्भ पडले. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी ही घटना कोणास सांगितल्यास खल्लास करून टाकतो अशी धमकी दिली. तसेच तिला मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Victim forced to take birth control pills after torture, crime against four