वसईत तरुणीने तर नालासोपाऱ्यात पुरुषाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 23:27 IST2019-05-24T23:27:08+5:302019-05-24T23:27:53+5:30
एका तरुणीने व एका पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या

वसईत तरुणीने तर नालासोपाऱ्यात पुरुषाने केली आत्महत्या
नालासोपारा - वसई आणि वालीव पोलीस ठाण्यांतर्गत एका तरुणीने व एका पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वसई पश्चिमेकडील कोळीवाडा पाचूबंदर येथील सेंटर जवळ राहणाऱ्या भाऊजी मनोज वासुदेव रामा यांच्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला रुमालाच्या सहाय्याने संजीवनी डॉमाणिक मानकर (23) या तरुणीने बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये नालासोपारा पूर्वेकडील जाधवपाडा परिसरातील ओमसाई चाळीमध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र रामफेर यादव (45) यांनी घरातील पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.