UP Crime:उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलच्या बंद खोलीत हैदराबादमधील बहीण आणि भावाचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांच्या तोंडावाटे रक्ताच्या गुठळ्या बाहेर आल्या होत्या आणि खोलीत औषधांची रिकामी पाकिटे पडलेली होती. धक्कादायक प्रकार म्हणजे, त्यांच्या सामानाची झडती घेतली असता तब्बल ६ लाख ६१ हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली आहे.
हैदराबाद-सिकंदराबादमधील सीताफल मंडी परिसरातील रहिवासी असलेले गणेश गौड गुणलापल्ली (४६) आणि त्यांची बहीण धनलक्ष्मी गुणलापल्ली (३८) हे तीन दिवसांपूर्वी वाराणसीला फिरण्यासाठी आले होते. एका नामांकित हॉटेलमध्ये ते थांबले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हे दोघेही खोलीबाहेर पडले नव्हते. मंगळवारी त्यांच्या चेक-आऊटची वेळ झाली असताना हॉटेल कर्मचाऱ्यांनी वारंवार फोन केले, पण प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना बोलवले.
खोली उघडताच भीषण दृश्य
पोलिसांच्या उपस्थितीत मास्टर की वापरून जेव्हा खोली उघडण्यात आली, तेव्हा बेडच्या जवळ जमिनीवर दोघांचेही मृतदेह पडलेले होते. त्यांच्या तोंडावाटे रक्त आणि फेस बाहेर आला होता. खोलीतील टेबलवर अनेक औषधांची रिकामी पाकिटे पडलेली होती. प्राथमिक अंदाजानुसार, दोघांनीही विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लाखोंची रोकड अन् लॅपटॉप; गूढ वाढलं
पोलिसांनी मृतांच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये ६,६१,००० रुपयांची रोख रक्कम, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट, एक लॅपटॉप सापडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जवळ असूनही दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न आता पोलिसांना सतावत आहे. खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
पोलीस तपासात काय समोर आले?
वाराणसीचे पोलीस उपायुक्त गौरव बन्सल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, "प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत आहे. खोलीत जबरदस्तीने प्रवेश केल्याचे किंवा झटापटीचे कोणतेही पुरावे नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हैदराबादमधील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत."
Web Summary : A brother and sister from Hyderabad were found dead in a Varanasi hotel room. Police discovered a large sum of cash and medications. Suicide suspected, investigation ongoing.
Web Summary : वाराणसी के एक होटल के कमरे में हैदराबाद के एक भाई और बहन मृत पाए गए। पुलिस को बड़ी मात्रा में नकदी और दवाएं मिलीं। आत्महत्या का संदेह, जांच जारी है।