Vaidyanath bank chairman caught while taking a bribe | वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षास लाच घेताना पकडले

वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षास लाच घेताना पकडले


परळी - येथील वैद्यनाथ अर्बन बँकेच्या खातेदाराला २.५ कोटींचे कॅश क्रेडिट कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून १० लाखांची लाच घेताना बँकेचे अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन यांना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. त्यांना ताब्यात घेऊन परळी शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. सायंकाळी गुन्हा नोंदवणे सुरु होते.

२०१८ मध्ये कॅश क्रेडिट खात्याचे अडीच कोटी रुपये कर्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील किराणा व्यापारी असलेल्या कर्जदारास मंजूर करण्यात आले होते. त्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे १५ लाखांची मागणी अशोक जैन यांनी केली होती. किराणा दुकान व शेती असलेल्या कर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १९ ऑक्टोबर रोजी मोंढा येथील दुकानात दहा लाख रुपये स्वीकारून उर्वरित पाच लाख रुपये नंतर घेण्याचे जैन यांनी सांगूनलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता.

 

Web Title: Vaidyanath bank chairman caught while taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.