शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा चेहराच सगळं सांगून गेला; पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन् सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:27 IST

गुजरातमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघड झाली.

Gujarat Crime:गुजरातच्या वडोदरा शहरातून प्रेमसंबंधातून घडलेल्या एका थरारक खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वडोदरा येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीची त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे भासवण्यात आले आणि मृतदेह दफन करण्यात आला. मात्र कुटुंबाला संशय आल्याने, त्यांनी मृतदेह दफन केल्यानंतर पाच दिवसांनी बाहेर काढला आणि शवविच्छेदनातून हा खूनच असल्याचे सिद्ध झाले आहे.

इरशाद अब्दुल करीम बंजारा यांचा १८ नोव्हेंबर रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीला हा अपघाती मृ्त्यू समजून दुसऱ्याच दिवशी त्यांना दफन केले. मात्र, दफनविधीनंतर बंजारा यांच्या पत्नीचे वागणे पाहून कुटुंबियांचा संशय बळावला. दुःखद प्रसंगीही पत्नीच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख किंवा शोक दिसून येत नव्हता, असे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. यावरूनच कुटुंबियांनी पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा गंभीर आरोप केला.

मृत इरशाद अब्दुल करीम बंजारा याचा तळसली परिसरात १८ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. इरशाद यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, त्यांची पत्नी गुलबानूने मुंबईतील तिचा मित्र तोसिफ आणि आणखी एका साथीदाराच्या मदतीने इरशादला झोपेच्या गोळ्या देऊन गुंगी आणली आणि त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून केला.

पत्नीच्या मोबाइल फोनवरील संशयास्पद कॉलमुळे या हत्येचे भयानक सत्य उघड झाले.  कुटुंबियांनी गुलबानूचा मोबाइल फोन तपासला असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. गुलबानूने एकाच नंबरवर वारंवार कॉल केल्याचे समोर आले. या मोबाइल कॉलमुळे तिचा प्रियकर आणि हत्येतील तिचा सहभाग याबद्दल कुटुंबियांचा संशय अधिकच बळावला. कुटुंबियांनी याबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी केली. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दफन केलेल्या इरशाद यांचा मृतदेह पाच दिवसांनी बाहेर काढला.

मृतदेहाचे खरे कारण शोधण्यासाठी तो गोत्री रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचे प्राथमिक निष्कर्ष अत्यंत धक्कादायक होते. वैद्यकीय तपासणीत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूची शक्यता फेटाळण्यात आली आणि बंजारा यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले.खून झाल्याचे समोर येताच, पोलिसांनी इरशादची पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची नेमकी पद्धत आणि सहभागी असलेल्या व्यक्तींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife's Unreadable Face Reveals Murder; Exhumed Body Exposes Truth

Web Summary : Gujarat man murdered by wife, lover. Initial accident claim failed after family suspected foul play. Exhumed body revealed strangulation. Police investigate.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिस