शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी असतानाही बँक मॅनेजरने अशी बनवली गर्लफ्रेंड; लग्न, सेक्स अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 14:21 IST

पीडितेने केलेल्या आरोपानुसार, प्रणवने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगून तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले होते. यानंतर तो सातत्याने लैंगीक शोषण करत होता.

उत्तर प्रदेशातील लखनौमधील गोमतीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्टेट बँकेच्या हजतरगंज शाखेच्या मॅनेजरला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुरुवारी पोलीसांनी अटक केली. प्रणव द्विवेदी असे या आरोपीचे नाव आहे.

पीडितेने केलेल्या आरोपानुसार, प्रणवने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगून तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले होते. यानंतर तो सातत्याने लैंगीक शोषण करत होता. पण, सत्य समोर आल्यानतंर संबंधित पीडितेने प्रणवविरोधात बुधवारी गोमतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पहिली पत्नी त्रास देते... तिला घटस्फोट देईन - गोमतीनगर येथील संबंधित पीडिता (26) बँकेत कर्मचारी आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून भोपाळच्या मालवीयनगर येथील प्रणवला ओळखत होती. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, कामादरम्यानच त्यांची ओळख झाली होती. तो म्हणत होता, की पत्नीच्या वगण्यामुळे तो त्रस्त झाला आहे आणि लवकरच पत्नीला तलाक देणार आहे. याच बरोबर त्याने पीडितेलाही लग्नाचा प्रस्ताव दिला होता. यावर तीही राजी झाली. यानंतर तो तिचे सातत्याने शोषण करत होता.

मंदिरात केलं लग्न - तरुणीने म्हटल्याप्रमाणे, ती प्रणववर अनेक दिवसांपासून लग्नासाठी दबाव टाकत होती. अखेर 23 मे रोजी आरोपी संबंधित तरुणीला आपल्यासोबत घेऊन गेला. यानंतर त्याने गोमतीनगर येथील मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर प्रणवने तरुणीला घरी जाण्यास सांगितले. पण ती प्रणवसोबत जाण्यावर ठाम होती. यावर प्रणवने मुलीला घरी घेऊन जाण्यास नकार देत धमकावले होते.

पत्नीसह चाकू घेऊन पोहोचला होता घरी -पीडितेने सांगितल्यानुसार, तिने प्रणवच्या पहिल्या पत्नीला मंदिरात लग्न केल्याची माहितीही दिली होती. यावर आरोपीची पत्नी लखनौला आली. यानंतर 24 मे रोजी रात्री प्रणव पत्नीसह तिच्या घरी पोहोचला. येथे या दोघांनीही तिला मारहाण केली आणि चाकूने हल्ला करून जखमी केले. एवढेच नाही, तर मॅनेजरच्या पत्नीने आपल्याला आत्महत्या करण्यासाठीही विवश केले होते, असा गंभीर आरोपही संबंधित पीडितेने केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसbankबँक