शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! दोनचा पाढा विसरल्याने विद्यार्थ्याच्या हातावर शिक्षकाने चालवली ड्रिल मशीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 10:47 IST

दोनचा पाढा विसरला म्हणून एका विद्यार्थ्याच्या हातावर चक्क ड्रिल मशीन चालवल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षकाने क्रूरतेचा कळस गाठला आहे. दोनचा पाढा विसरला म्हणून एका विद्यार्थ्याच्या हातावर चक्क ड्रिल मशीन चालवल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थी हा कानपूर जिल्ह्यातील सिसामऊ भागातील रहिवासी आहे. प्रेमनगरमधील उच्च प्राथमिक शाळेत पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या घटनेची माहिती मिळताच पीडित विद्यार्थ्याचे नातेवाईक शाळेत पोहोचले. यावेळी शाळेच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. "शिक्षकाने मला दोनचा पाढा विचारला. मला पाढा सांगता न आल्याने त्यांनी माझ्या हातावर ड्रिल मशीन चालवली. तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने ड्रिल मशीनचा स्विच बंद केला" असं विद्यार्थ्याने म्हटलं आहे. 

विद्यार्थ्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यावर उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला शाळेतील शिक्षकांनी स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली नव्हती. मात्र, पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी शाळेत घातलेल्या गोंधळानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

कानपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुजीत कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या घटनेचा तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रेमनगर आणि शास्त्री नगरचे ब्लॉक शिक्षण अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवतील. दोषीवर दंडात्मक कारवाई केली जाईल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकStudentविद्यार्थी