शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मुख्तार अन्सारीचा शूटर संजीव जीवाची लखनऊ कोर्ट परिसरात गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात आला होता हल्लेखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:06 IST

हल्लेखोर येथे वकिलाच्या वेशात पोहोचला होता. हल्लेखोराला घटनास्थळीच अटकही करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये कुख्यात गुन्हेगार संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लखनऊ न्यायालय परिसरात ही घटना घडली. जीवाला अनेक गोळ्या लागल्या आहेत. यात दोन इतर लोकांनाही गोळ्या लागल्या आहेत. यात एका मुलाचाही समावेश आहे. त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. 

हल्लेखोर येथे वकिलाच्या वेशात पोहोचला होता. हल्लेखोराला घटनास्थळीच अटकही करण्यात आली आहे. या घटनेमुळे संतप्त वकिलांनी दगडफेक केली. दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले आहेत.संजीव जीवा हा मुख्तार अन्सारी आणि मुन्ना बजरंगी गँगशी संबंधित होता. भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येतही संजीव जीवाचे नाव आले आहे. मात्र, नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. संजीव हा पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वात कुख्यात गुन्हेगार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपासून तो लखनौ कारागृहात होता. त्याला येथूनच एका खटल्यासाठी न्यायालयात नेण्यात आले होते. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर, आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही संजीव माहेश्वरीने व्यक्त केली होती.

भाजपचे बडे नेते माजी मंत्री ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतही जीवाचा हात होता. द्विवेदी यांची 10 फेब्रुवारी 1997 रोजी लोहाई रोडवर गोळी मारून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने लखनऊ न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. 17 जुलै 2003 रोजी सीबीआय न्यायालयाने माजी आमदार विजय सिंह आणि शामली जिल्ह्यातील आमदपूर गावचा रहिवासी असलेल्या शूटर संजीव महेश्वरी उर्फ जीवा या दोघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.

संजीवची पत्नी पायल हिने 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाशांना पत्र लिहून पतीच्या पेशीदरम्यान हत्येच्या कटाची शंका व्यक्त करत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयDeathमृत्यूPoliceपोलिस