शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ऑन ड्युटी हवालदाराची हत्या करणारे कुख्यात आरोपी एनकाउंटरमध्ये ठार; युपी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 16:43 IST

आरोपींनी 10 मे रोजी कर्तव्यावर असलेल्या हवालदाराची गोळ्या झाडून हत्या केली होती.

उत्तर प्रदेशातून एनकाउंटरची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील जालौन जिल्ह्यात कॉन्स्टेबल भेडजीत हत्याकांडातील फरार गुन्हेगारांची आज दुपारी पोलिसांशी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी एका आरोपीचा जागीच खात्मा केला, तर एका आरोपीला गोळी लागल्याने घाईघाईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण,  उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या चकमकीत ओराईचे इन्स्पेक्टरही जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार दिवसांपूर्वी 10 मे रोजी आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबल भेदजीत यांची गोळ्या घालून हत्या केली होती. कॉन्स्टेबलच्या हत्येनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. जिल्ह्याच्या एसपींपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसपींना लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेण्यास सांगितले होते, तेव्हापासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते. 

आज ओराई कोतवाली पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी फॅक्टरी एरिया पोस्ट परिसरात लपून बसले आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना घेराव घातला आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, परंतु हल्लेखोरांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिस पथकानेही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या गोळीबारादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आरोपीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा रुग्णालयात मरण पावला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस