शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! दोन सख्ख्या बहिणींवर...; मोठी मुलगी गर्भवती झाल्याचं समजताच कुटुंबीयांना बसला धक्का अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 10:00 IST

गावातील तरुणांनी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांना जंगलात नेले आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेनंतर, जेव्हा मोठी मुलगी गरोदर असल्याचे घरच्यांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील तरुणांनी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करून त्यांना जंगलात नेले आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेनंतर, जेव्हा मोठी मुलगी गरोदर असल्याचे घरच्यांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला. संबंधित पीडित कुटुंबाने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे. यावर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

हे प्रकरण बदौसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणार्या पीडितेच्या आईने दिलेल्या महितीनुसार, "गेल्या 20 जुलैला माझ्या दोन्ही अल्पवयीन मुली घरात झोपल्या होत्या. मी आणि माझा पती सकाळी उठलो, तर दोन्ही मुली घरात नव्हत्या. घरात बघितले असता रूमचे छत तुटलेले होते. यानंतर आम्ही मुलींचा शोध घेतला होता, पण त्या सापडल्या नव्हत्या."

'धमकावत आळी-पाळीने केला बलात्कार' -पीडित मुलींच्या आईने सांगितले, '21 जुलैच्या सायंकाळी दोन्ही मुली घरी परतल्या आणि सांगितले की, गावातील काही लोक घराचे छप्पर तोडून आम्हाला जबरदस्तीने घेऊन गेले. यानंतर त्यांनी धमकावत आळी-पाळीने बलात्कार केला". एढेच नाही, तर हे लोक जीवे मारण्याची धमकी देत मुलींवर गेल्या अनेक महिन्यांपासून बलात्कार करत होते, असा आरोपही संबंधित कुटुंबीयांनी केला आहे.

5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल - कुटुंबीयांनी म्हटल्यानुसार, सामूहिक बलात्कारानंतर, त्यांची मोठी मुलगी गर्भवती झाली आहे. महिलेने पोलिसत तक्रार करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर पोलिसांनी 5 जनांविरोधात सामूहिक बलात्कार, पॉक्सो अॅक्ट सह इतरही काही कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना एसएचओ विजय कुमार म्हणाले, संबंधित तक्रारीनंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बरोबर, पीडित मुलींचे मेडिकलही करण्यात आले आहे. पीडित मुलींनी न्यायालयात जबाब दिल्यानंतर पुढील कारवाई केली जात आहे. याशिवाय आरोपींचा शोधही घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण