शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! मोठ्या भावानेच केला विवाहित बहिणीवर बलात्कार; Video व्हायरल करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:03 IST

Crime News : पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगू नये यासाठी तिला बलात्काराची व्हिडीओ क्लिप ऑनलाईन अपलोड करून व्हायरल केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे भावाच्या मित्रानेच या घटनेचा एक व्हिडीओ शूट केला आहे. पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगू नये यासाठी तिला बलात्काराची व्हिडीओ क्लिप ऑनलाईन अपलोड करून व्हायरल केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील एका गावात भावाने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नशेत असताना हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. 23 डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेचा घरी नसताना मोठा भाऊ तिच्या घरी आला. त्यावेळी तो नशेत होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला आणि महिलेला धमकी दिली. तक्रार केल्यास अथवा कोणालाही याबाबत सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल केल्याची धमकी दिली. 

पीडित महिलेने आपल्या घरी हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावर आई-वडिलांनीही तिला पोलिसात न जाण्यास सांगितलं. त्यासाठी तिच्यावर दबाव आणला. आरोपी वारंवार त्रास देत असल्याने महिलेने पोलिसांत धाव घेऊन तिच्यासोबत घडलेला हा भयंकर प्रकार सांगितला. महिलेने तक्रार दिल्यानंतर मुरादाबाद पोलिसांनी पीडितेचा भाऊ व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. "ही घटना घडल्यानंतर आपण पतीला सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण कुटंबीयांनी समाजातील प्रतिष्ठा धुळीला मिळेल असं सांगत तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला" असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

विकृतीचा कळस! दारूच्या नशेत मुलाने केला 75 वर्षीय आईवर बलात्कार

आरोपी भाऊ महिलेचं घर असलेल्या परिसरातच फिरायला लागला. तसेच तिला घाबरवून धमकी देऊ लागला. त्यामुळे तक्रार केल्याचं महिलेने म्हटलं आहे.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या 75 वर्षीय आईवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नशेत घरी आलेल्या आरोपीने आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर अत्याचार केला. आरोपीच्या सूनेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

आग्रा येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीकरी या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. 45 वर्षीय अमर सिंह हा पत्नी, मुलगा आणि सूनेसोबत राहत आहे. अमर सिंह रोज दारू पिऊन घरी येत असे. बुधवारी रात्री अमर सिंह याचा मुलगा घरात नव्हता. त्याचवेळी अमर सिंह हा दारू पिऊन घरी आला. तो खोलीत गेला आणि आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरड केल्यानंतर अमर सिंहची पत्नी आणि सून मदतीसाठी धावून गेली. मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्या काही करू शकल्या नाहीत. लज्जास्पद प्रकारानंतर सूनेने लगेचच पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात़डीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अमर सिंह याला ताब्यात घेतले. 

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी