शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो; 52 वर्षीय महिला 26 वर्षीय तरुणाच्या प्रेमात, असा झाला रक्तरंजित अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:09 IST

Uttar Pradesh Crime: महिलेने इंस्टाग्रामवर एडीट केलेले फोटो टाकले; तरुण प्रेमात पडला..!

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून एक प्रेम प्रकरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ५२ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या २६ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या प्रेम प्रकरणात महिलेने लग्न आणि पैशासाठी  दबाव आणल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलले.

फर्रुखाबादची रहिवासी असलेली ५२ वर्षीय महिला तिच्या अर्ध्या वयाच्या मुलाच्या प्रेमात पडली. दोघेही इंस्टाग्रामद्वारे जवळ आले होते. महिलेने इंस्टाग्रामवर फिल्टर फोटो वापरल्यामुळे मुलाला तिचे वय कळले नाही. परंतु हेच प्रेम महिलेच्या जीवावर उठले. लग्न आणि पैशांसाठी दबाव टाकल्यामुळे वैतागलेल्या तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. सुमारे एका महिन्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

असा झाला खुलासामैनपुरीच्या कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचे नाव राणी असल्याचे पोलिसांना तपासात समजले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या हत्याकांडाची उकल करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सखोल तपासानंतर पोलिसांनी आरोपी अरुण राजपूतला अटक केली. आरोपीने इन्स्टाग्रामद्वारे महिलेशी मैत्री केली होती. अरुणने चौकशीदरम्यान सांगितले की, महिलेने तिचे वय लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला होता.

एसपी अरुण कुमार सिंह म्हणाले की, मृत महिला राणी (५२) आणि आरोपी अरुण राजपूत (२६) यांची दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर मैत्री झाली. राणीला चार मुले आहेत. मैत्रीनंतर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू झाली. महिलेने तिचे वय लपवण्यासाठी इन्स्टाग्रामवर फिल्टरचा वापर केला होता, ज्यामुळे आरोपी तिच्या जाळ्यात अडकला. नंतर महिलेने अरुणवर लग्न करण्यासाठी आणि तिने दिलेले १.५ लाख रुपये परत करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.

लग्न आणि पैशाच्या दबावामुळे हत्यामहिलेच्या सततच्या दबावामुळे आरोपी नाराज होता. १० ऑगस्ट रोजी त्याने राणीला मैनपुरी येथे बोलावले. दोघेही खारपरी बांबा जवळील झुडपात भेटले. तिथे राणीने पुन्हा त्याच्याशी लग्न करण्याची आणि पैसे परत करण्याची मागणी केली. तसेच, अरुणला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकीही दिली. रागाच्या भरात अरुणने राणीचा दुपट्ट्याने गळा दाबला आणि घटनास्थळावरून पळ काढला. कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस