शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भिवंडीत युरियाचा अवैध साठा हस्तगत, दुधात भेसळ करण्यासाठी वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:08 IST

पूर्णा येथील विमल कम्पाउंडमध्ये असलेल्या साई श्रद्धा एजन्सीच्या गोदामावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकून सात टन युरिया खताचा अवैध साठा जप्त केला.

भिवंडी : पूर्णा येथील विमल कम्पाउंडमध्ये असलेल्या साई श्रद्धा एजन्सीच्या गोदामावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकून सात टन युरिया खताचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणी गोदाम व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.पूर्णा येथील विलास दगडू पाटील, बेळगाव येथील ट्रकचालक जावेद हुसेनसाब मुल्ला आणि क्लीनर रमजान मुन्ना मुल्ला ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही सोमवारी भिवंडीत न्यायालयाने ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. युरिया खतामध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेटमध्ये गोदाममालक, चालक, खत उत्पादक, साठवणूक करणारा तसेच पुरवठादार आदींचा समावेश असल्याने या सर्वांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.भिवंडीतील पूर्णा येथील गोदामात औषधनिर्मिती व दूधभेसळीसाठी वापरण्यात येणाºया युरिया खताचा अवैध साठा केला जात असल्याची खबर अमली पदार्थविरोधी पथकास मिळाल्याने रविवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. त्यावेळी कर्नाटक येथून युरिया खत भरून आलेल्या ट्रकमधून गोदामात खताच्या गोण्या भरल्या जात असल्याचे दिसून आले. यावेळी गोदाम व्यवस्थापक विलास पाटील याच्याकडे युरिया खतसाठा परवान्याची चौकशी केली असता, त्यांच्याकडे परवाना नसल्याचे उघड झाले.खतांच्या गोण्यांवर कोणताही बॅच क्रमांक अथवा निर्मिती तारीखदेखील नव्हती. त्यामुळे हे युरिया खत शेतकऱ्यांना न पुरवता, ते अन्यत्र भेसळीसाठी साठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रकसह युरिया खताच्या सात टन वजनाच्या १५१ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची व्याप्ती तपासली जात असल्याची माहिती एपीआय के.आर. पाटील यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी