शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

क्रूझ ड्रग्स पार्टीच्या इंव्हिटेशनसाठी इंस्टाग्रामचा वापर, 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फीस; बाकी डिटेल्स जाणून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 13:08 IST

समुद्रात जेथे पोलिसांची भीती नसते, अशा ठिकाणी या ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लोकांना आकर्षक किट भेट देऊनही इंव्हाइट करण्यात आले होते. 

मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये ड्रग्स पार्टीदरम्यान रविवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने छापेमारी करत एका मोठ्या अॅक्टरच्या मुलासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, सहभागी लोकांनी त्यांच्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागामध्ये आणि कॉलरच्या शिलाईमध्ये ड्रग्स लपवून नेले होते. तथापि, NCB पुन्हा एकदा या सर्व माहितीचा तपास करत आहे आणि यासंदर्भात संबंधित लोकांची चौकशीही करत आहे. (Use of Instagram for Cruise Drugs Party Invitations, entry fees up to Rs 5 lakh; know the details)

या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? -समुद्रात जेथे पोलिसांची भीती नसते, अशा ठिकाणी या ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे क्रूझवरील या ड्रग्स पार्टीची प्रवेश फीस 80 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती. या क्रूझची क्षमता सुमारे 2 हजार लोकांची आहे. मात्र, येथे 1 हजार पेक्षा कमी लोकच उपस्थित होते. या पार्टीसाठी इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी लोकांना आकर्षक किट भेट देऊनही इंव्हाइट करण्यात आले होते. 

क्रूझ पार्टीत सहभागी झालेले अधिकांश लोक दिल्लीचे -या क्रूझ पार्टीत सहभागी झालेले अधिकांश लोक दिल्लीचे आहेत, ते विमानाने मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले. अरबाज नावाच्या व्यक्तीची एनसीबीकडून चौकशीही सुरू आहे. एनसीबीला तपासादरम्यान त्याच्या शूजमधून ड्रग्स सापडले. सूत्रांच्या माहितीनुसार, अरबाजनेच अभिनेत्याच्या मुलाला सोबत नेले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एनसीबीने अद्याप लोकांची नावे अधिकृतपणे उघड केलेली नाहीत.

क्रूझवर पकडण्यात आलेल्यांना परत मुंबईत आणण्यात आले आहे. आता पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमने या क्रूझवरील हा छापा टाकला आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी