शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक तुझे के लिये! प्रेयसीच्या आत्महत्येची बातमी समजताच प्रियकराने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 21:50 IST

Suicide Case : या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेमीयुगलाचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. 

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे एका प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. अल्पवयीन प्रेयसीने आधी आत्महत्या केली. तिच्या मृत्यूची बातमी समजताच १८ वर्षीय तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेमीयुगलाचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. 

गावकऱ्यांच्या सततच्या टोमण्यांना हे प्रेमीयुगुल आयुष्याला कंटाळलं होतं असल्याची चर्चा आहे. अखेर कंटाळून त्यांनी हे भयानक पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना फतेहगंज पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तिसुआ क्रॉसिंगला घडली. प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावरून उचलून पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवले. 

शाहजहानपूरच्या कटरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचे गावातल्या १६ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. कटरा पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी तरुणाने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती समजल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचललं, अशी चर्चा आहे. फतेहगंज पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसुआजवळ तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तरुणी सकाळी शौचासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, नंतर तिचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावरून बाजूला घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

आत्महत्या केलेलं प्रेमीयुगुल शाहजहानपूर जिल्ह्यातलं रहिवासी आहे. एकाच गावात राहणाऱ्या या दोघांचं प्रेम गावकऱ्यांना मान्य नव्हते. या दोघांना गावकरी सारखे टोमणे मारायचे आणि मानसिक त्रास द्यायचे, असं म्हणतात. या त्रासाला कंटाळून दोघांनी रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू