शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

युपीत थरार! उमेश पालवर पहिली गोळी झाडणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर, पोलिसांनी ठेवले होते बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 09:00 IST

उमेश पाल हत्याप्रकरणी युपी पोलीस एक्शन मोडवर असून  विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी या आरोपीला ठार करण्यात आलंय

लखनौ - युपी विधानसभेत विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी उमेश पाल खून प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 'माफिया कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना जमीनदोस्त केले जाईल,' असे योगींनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी उमेश पालच्या हत्येतील एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला. आता, याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीचाही एन्काऊंटर करण्यात आलाय. युपी पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला. या आरोपीवर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

उमेश पाल हत्याप्रकरणी युपी पोलीस एक्शन मोडवर असून  विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी या आरोपीला ठार करण्यात आलंय. या उस्मान चौधरीनेच उमेश पाल यांस पहिली गोळी मारली होती, असे सांगण्यात येते. प्रयागराजच्या कौधियारा परिसरात पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये, उस्मानला पोलिसांची गोळी लागली. त्यानंतर, त्यास उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आले. मात्र, डॉक्टरांनी आरोपी उस्मानला मृत घोषित केले. यापूर्वी पोलिसांनी अतीक अहमदचा खास माणूस असलेल्या अरबाजला ठार केले होते. 

युपीत माफियांविरुद्ध कडक कारवाई

राज्यात गुंड आणि माफियांविरोधात 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी असेल. विशेष म्हणजे, यूपीमध्ये 'योगीराज' सुरू झाल्यापासून गुंड आणि माफियांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तुम्ही आकडे बघितले तर योगी सरकारमध्ये मार्च 2017 ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत, सुमारे 170 गुन्हेगार मारले गेले आहेत. तसेच, 4500 हून अधिक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. गरज पडली तर गाडीही पलटी होईल आणि गोळीही चालेल, असे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात सार्वजनिक मंचांवर सांगत असतात.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश