संतापजनक! उपचाराच्या नावाखाली तांत्रिकाने दीड वर्षाच्या मुलाचे दात तोडले, जमिनीवर फेकले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:49 IST2023-02-10T15:40:51+5:302023-02-10T15:49:03+5:30

एका तांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली चिमुकल्याचे दात तोडून त्याला जमिनीवर फेकल्याचा आरोप आहे.

up one and half year old child died after tantrik treatement | संतापजनक! उपचाराच्या नावाखाली तांत्रिकाने दीड वर्षाच्या मुलाचे दात तोडले, जमिनीवर फेकले अन्...

संतापजनक! उपचाराच्या नावाखाली तांत्रिकाने दीड वर्षाच्या मुलाचे दात तोडले, जमिनीवर फेकले अन्...

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील कोतवाली खुर्जातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली चिमुकल्याचे दात तोडून त्याला जमिनीवर फेकल्याचा आरोप आहे, यामध्ये लहान मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तक्रारीनंतर आरोपी तांत्रिकला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुर्जा कोतवाली परिसरातील ढाकर गावात ही भयंकर घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या सौरभने सांगितले की, दीड वर्षांचा अनुज रात्री आजारी पडला, त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला गावात राहणाऱ्या तांत्रिकाकडे नेले. तांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली निरागस बालकाचे दात तोडले, एवढेच नाही तर त्याला जमिनीवर देखील फेकून दिले.

चिमुकला अनुज यानंतर बेशुद्ध झाला. पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी अनुजला मृत घोषित केले. अनुजचा मृत्यू झाल्याने कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. तांत्रिकावर कारवाई करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी कोतवाली परिसरात गोंधळ घातला. 

तांत्रिकाच्या उपचारामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची बाब गांभीर्याने घेत कोतवाली पोलिसांनी तत्काळ आरोपी तांत्रिकाला ताब्यात घेतलं आहे. तसेच लहान मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: up one and half year old child died after tantrik treatement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.