शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

विवाहित महिलेने भेटण्यास दिला नकार, माथेफिरू तरूणाने पाठवली Ambulance आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 09:29 IST

UP Crime News : महिलेने नकार दिला तेव्हा त्याने महिलेच्या घरी एका  हॉस्पिटलमधून अॅम्बुलन्स पाठवली. तेही हे सांगून की, महिलेच्या घरी डिलेव्हरी होणार आहे. 

उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका माथेफिरू प्रियकराने असं कृत्य केलं ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवा खावी लागू शकते. हा तरूण एका विवाहित महिलेवर प्रेम करत होता. पण महिलेने जेव्हा त्याला नकार दिला तेव्हा तिला मिळवण्यासाठी त्याने नको नको ते केलं. तो महिलेला म्हणाला की, मला येऊन भेट. महिलेने नकार दिला तेव्हा त्याने महिलेच्या घरी एका  हॉस्पिटलमधून अॅम्बुलन्स पाठवली. तेही हे सांगून की, महिलेच्या घरी डिलेव्हरी होणार आहे. 

जेव्हा महिलेला याबाबत समजलं तेव्हा तिने आधी याकडे फार लक्ष दिलं नाही. तरूणाने पुन्हा तिला फोन केला आणि म्हणाला की, मला येऊन भेट  नाही तर मी काहीही करू शकतो. महिलेने पुन्हा त्याला भेटण्यास नकार दिला. यावेळी तरूणीने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, या महिलेने आत्महत्या केली आहे. 

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना समजलं की, तरूणाने खोटं सांगितलं. महिलेने तेव्हा पोलिसांना सांगितलं की,  हा तरूण तिला गेल्या 2 महिन्यांपासून त्रास देत आहे. महिलेने सासरच्या लोकांसोबत मिळून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांची टीम आता  या तरूणाचा शोध घेत आहेत. 

पीडित महिलेने सांगितलं की, ती विवाहित आहे. ती तिच्या सासरच्या लोकांसोबत राहते. तिला एक मुलही आहे. दोन महिन्याआधी तिला रजत मिश्रा नावाच्या तरूणाचा फोन आला होता. तो तिला म्हणाला की, त्याचं तिच्यावर प्रेम आहे. हे ऐकताच महिलेने त्याला खडसावलं आणि फोन कट केला. त्यानंतर हा तरूण महिलेला रोज फोन करत होता. महिलेने त्याला भेटण्यास नकार दिला तर त्याने तिच्या घरी अॅम्बुलन्स पाठवली.  

हॉस्पिटलवाल्यांनी महिलेला सांगितलं की, आम्हाला कुणीतरी सूचना दिली की, तुमच्या घरी डिलेव्हरी होणार आहे. महिला हे ऐकताच हैराण झाली. तेव्हा तिला समजलं की, हे सगळं तो तरूण करत आहे. महिला पुन्हा रजतवर ओरडली. तिला वाटलं की, आता पुन्हा तो असं काही करणार नाही. पण तो काही शांत बसला नाही. त्याने पोलीस कंट्रोल रूममध्ये फोन केला आणि महिलेचा पत्ता देत सांगितलं की, या महिलेने आत्महत्या केली आहे. 

नंतर त्याचा फोन स्वीच ऑफ लागत होता. तेव्हा महिलेने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या नंबरच्या आधारावर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी