शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

प्रियकराच्या मदतीने मुलीने आई-वडिलांची केली हत्या, कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर होता डोळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:24 IST

UP Crime News : याप्रकरणी पोलिसांनी 10 तासांमध्ये या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी दावा केला की, दाम्पत्याची हत्या त्यांच्याच मुलीने केली आहे. हे कृत्य करण्यासाठी तिने तिच्या प्रियकराची मदत घेतली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

UP Crime News :  कानपूरच्या बर्रा-2 यादव मार्केटमध्ये मंगळवारी एका घरात एका दाम्पत्याचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. पोलिसांनी सांगितलं होतं की, 61 वर्षीय मुन्ना लाल उत्तम आणि त्याची 55 वर्षीय पत्नी राजदेवीची काही लोकांनी धारदार शस्त्रांनी गळा कापून हत्या केली. या घटनेवेळी दाम्पत्याची मुलगी कोमल आणि मुलगा घरात होते. याप्रकरणी पोलिसांनी 10 तासांमध्ये या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी दावा केला की, दाम्पत्याची हत्या त्यांच्याच मुलीने केली आहे. हे कृत्य करण्यासाठी तिने तिच्या प्रियकराची मदत घेतली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, आई-वडिलाने मुलीच्या प्रेमाचा विरोध केला होता. त्यांनी तिला प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. सोबतच वडिलांच्या नावे कोट्यावधीची संपत्ती होती. जी मुलगी आणि तिच्या प्रियकराला मिळवायची होती. त्यामुळेच मुलीने आई-वडिलांची हत्या केली.पोलिसांनी सांगितलं की, मुलीने सोमवारी रात्री आपल्या आई-वडिलांना आणि भावाला ज्यूसमधून नशेचा पदार्थ दिला होता. सगळेच बेशुद्ध झाले.

त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला बोलवलं आणि आई-वडिलांची गळा कापून हत्या केली. हत्येनंतर प्रियकर गेल्यावर तिने आरडा-ओरड केली. ते ऐकून दुसऱ्या मजल्यावर झोपलेला भाऊ खाली आल्यावर तिने सांगितलं की, तीन लोक आले होते त्यांनी आई-वडिलांची हत्या केली. तरूणीचा भाऊ अनूपने सांगितलं की, रात्री त्याच्या बहिणीने पिण्यासाठी ज्यूस दिलं होतं. पण त्याची टेस्ट चांगली नव्हती. त्यामुळे तो प्यायला नाही. थोड्या वेळाने तो बेशुद्ध झाला.

जॉइंट कमिश्नर आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितलं की, दाम्पत्याचे मृतदेह ग्राउंड फ्लोरच्या वेगवेगळ्या रूममध्ये आढळून आले. त्यांनी सांगितलं की, मुलीनेच तिच्या आई-वडिलांचे मृतदेह आधी बघितले होते. आधी कोमलने पोलिसांना भरकटवण्यासाठी सांगितलं की, 'वडील बाहेरच्या रूममध्ये झोपले होते. मी मधल्या रूममध्ये आईसोबत झोपले होते. भाऊ  पहिल्या पहिल्या मजल्यावर झोपला होता. हत्या कधी झाली समजलंच नाही. आवाज ऐकून उठले तर पाहिलं की, तीन लोक घरातून पळत आहेत. दरम्यान पोलिसांनी आधीच शंका व्यक्ती केली होती की, हत्या करणारे आधीच दाम्पत्याला ओळखत होते.

घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरूण घरात शिरताना दिसला. कुणीतरी घरातून दरवाजा उघडला आणि तो थेट आत गेला. साधारण दीड तासांनंतर तो बाहेर आला. त्यावेळी त्याने तोंड झाकलेलं होतं. पोलिसांना आढळलं की, घरात जाताना त्याच्या हातात काहीच नव्हतं. पण परत येताना त्याच्या हातात एक बॅग होती. हा तरूण मुलीचा प्रियकर होता.

पोलिसांना मुलीच्या हातावर दोन जखमा आढळून आल्या. तसेच प्रियकराच्या हातांवरही रक्त आढळून आलं आहे. इतकंच नाही तर मुलीने घटनेनंतर तिचे कपडे धुतले होते. त्या कपड्यांवरही रक्ताचे डाग दिसून आले.

दरम्यान अनूपने संशयाच्या आधारे आपल्या आई-वडिलांच्या हत्येचा संशय आपली पत्नी सोनिकाच्या भावांवर व्यक्त केला होता. त्याने सांगितलं की, 2017 मध्ये त्याचं लग्न सोनिकासोबत झालं होतं. पण एका आठवड्यानंतरच सोनिका तिच्या घरी परत गेली होती आणि परत आलीच नाही. त्यानंतर दोघांचं घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे.

त्याने पोलिसांना सांगितलं की, सोनिकाचा मोठा भाऊ सुरेद्र याने कुटुंबियांकडे 50 लाख रूपयांची नुकसान भरपाई मागितली होती. सोबतच धमकी दिली होती की, पैसे दिले नाही तर सर्वांची हत्या करणार. पोलिसांनी सांगितलं की, मृत मुन्नालाल ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये सुपरवायजर म्हणून रिटायर झाला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी